Alt Text

Khush Kharedi By Shankar Patil

  • Rs. 59.00
  • Save Rs. 41


Join as Seller
बाबू चांगलाच कर्जबाजारी झाला. तवनाप्पाचे घेतलेले दहा हजार रुपये कशानं फेडायचे हे कळेना झालं. अखेर यावर पंचाईत बसली आणि सगळ्यांंंनी मिळून असं ठरवलं, बाबूनं हे हॉटेल कर्जापोटी तवनाप्पाला लिहून द्यावं आणि तवनाप्पानं त्यात आपलं कर्ज वळतं करावं, इतरांचीही देणी भागवावीत आणि एक-दोन हजार रुपये बाबूला रोख द्यावेत. पंचाईतीत ठरल्याप्रमाणं सगळ्या गोष्टी नमूद करून पक्का कागद केला. रोख रुपये दोन हजार घेऊन खुशखरेदी लिहून दिली. हॉटेलची मालकी तवनाप्पाकडे आली. सगळ्या फर्निचरसह, सगळ्या वस्तूंसह हॉटेल ताब्यात देऊन बाबू मोकळा झाला. कुणाच्यातरी व्यवस्थेखाली `स्वल्पविराम' हॉटेल तवनाप्पा चालवू लागला आणि बाबूनं रोख मिळालेल्या पौशात जवळच दुसरं हॉटेल खोललं. असे आठ - पंधरा दिवस गेले आणि गावात जे अतिशहाणे चार लोक होते, त्यांनी एक नवीच शक्कल काढली. त्यांनी तवनाप्पाला शिकवलं ``तू हॉटेल घेतलंस, पन बाई का सोडलीस?''
-----------
प्रिय कट्टी सर याशी,
आपल्या प्रेमळ विद्यार्थ्याचा साष्टांग नमस्कार.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की, तुमी अलीकडे फार भकत चालला आहात. शाळेतल्या मुलींवर तुमी नजर ठेवून आहात. तुमचे बेत आमी सगळे विद्यार्थी वळकून आहो. तुमी काय समजता? मुलींच्या नादाला लागून तुमी मुलांच्यावर दात खाता हे बरं नाही. एका बुक्कीत तुमचे दात पाडू हे समजून असा. यापुढे नीट वागला तर बरे, नाही तर तुमाला पळवून लावू. रोज जैनाच्या सुमनच्या विहिरीत पवायला जाता, ते जाऊ नका. गेला त तुमचा गुडघ्यातनं पाय काडू. याद रावून असा. ही इंगळी आहे! तुमची हाडं काशीला जातील. या परास जास्त काय सांगायला नको. पोरांच्यावर दात खाल्ला तर बगा. तीन दिवसात सुधाराय पायजे, नाहीतर कंबरडं मोडलंच म्हणून समजा. गप आपलं शिकवायचं काम करत चला. बाकीची काय भानगड करायची नाही. पुन्ना आता वाकड्या नजरेनं पोरींच्याकडं बगितलेलं आडळलं, तर खुरप्यानं डोळं काडू हे धेनात ठेवून असावं. बरे असो.
आपला
एक विद्यार्थी

We Also Recommend