Khidakya Ardhya Ughadya by Ganesh Matakari

Khidakya Ardhya Ughadya by Ganesh Matakari

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller

या कहाण्या आहेत बड्या शहरातल्या पॉश सोसायट्यांमध्ये राहणा-या, फाइव्ह स्टार हॉटेलांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगा करणा-या, एनजीओ कल्चरमध्ये राहून सामाजिक काम करणा-या माणसांच्या. हा केवळ तथाकथित उच्चभ्रू वर्ग नाही, तर तो आजचा महत्त्वाकांक्षी मध्यमवर्ग आहे. या माणसांचं जगणं कसं आहे? त्यांच्या माणूसपणाचा पोत कसा आहे? सत्ता-प्रसिद्धी-पैसा मिळवण्याच्या धडपडीत या माणूसपणाशीच तडजोड केली जातेय का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथानकातून मिळतातच, असं नाही. पण प्रत्येक पात्राच्या खिडकीतून दिसणारं त्याचं त्याचं अवकाश आपल्याला उत्तराच्या जवळ नेतं. कधी या व्यक्ती स्वतःच स्वतःबद्दल सांगतात, तर कधी इतरांच्या कथनातून आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल कळतं. प्रत्येक व्यक्तिरेखेन आपल्या आपल्या कहाणीतून उघडलेल्या अर्ध्या उघड्या खिडक्यांमधून त्यांच्या `फ्रॅगमेंटेड` जगण्याचं दर्शन घडत जातं.


We Also Recommend