
Kashi Milel Icchanpasuna Mukti (कशी मिळेल इच्छांपासून मुक्ती) by Sirshree
प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगात एक मूळ इच्छा असते ती म्हणजे स्वतःला जाणण्याची, स्वानुभवाच्या सागरात स्वतःला विलिन करण्याची आणि ‘स्व’त्वाच्या अनुभूतीत स्थापित होण्याची. वास्तवात मानव असीम अस्तित्वाशी एका महान, उदात्त हेतूने जोडला गेलाय. म्हणूनच त्याच्या मनात सत्यात स्थापित होण्याची मूळ इच्छा सुप्तावस्थेत असते. पण अज्ञान, अहंकार, विकार, कुसंस्कार, दुराचार आणि बेहोशीमुळे त्याची ही मूळ इच्छा अनेक अनावश्यक आकांक्षांमुळे झाकोळली जाते. कारण त्याच्या या व्यर्थ इच्छांना ना कोणता मूलाधार असतो, ना कोणता दिव्य उद्देश.