Alt Text

Karnal Navacha Manus By Prafull Joshi

  • Rs. 119.00
  • Save Rs. 121


Join as Seller
एअरफोर्स, त्यानंतर आर्मी अशा दोन्ही विभागांत काम केलेल्या प्रफुल्ल जोशी यांचे हे पुस्तक लष्करी आयुष्यातील विविध अनुभव सांगते. या आत्मकथनात जोशी लष्करातील विविध घडामोडी सांगतात. आर्मी, आर्मीतील अधिकारी आणि सैनिक अथवा अधिकार्‍यांमधला माणूस शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. युद्ध आणि युद्धाची वर्णने सांगणारे लेख किंवा पुस्तके बरीच आहेत. जोशी यांचे हे आत्मकथन लष्करात माणूस कसा घडतो याची माहिती देते. लष्करात काम करताना आपल्या विभागात सुधारणा कशा केल्या, त्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले, सिस्टीम बदलायला किती वेळ लागतो, ते सारे जोशी यांनी विस्ताराने लिहिले आहे. कुठेही तक्रारीचा सूर नाही. आत्मप्रौढी सांगणारे प्रसंग नाहीत. लेखकाने तटस्थपणे घेतलेला वेध लष्करी वातावरण नेमके उभे करतो.

We Also Recommend