KALECHE KATADE. BY AANAD YADAV

KALECHE KATADE. BY AANAD YADAV

  • Rs. 150.00
  • Save Rs. 50


Join as Seller
मानवी जीवनात स्वत:च्याही नकळत स्वत:ची अधोगती कशी होत जाते, या कटू सत्याचे प्रभावी दर्शन 'कलेचे कातडे' या विलक्षण वेगळ्या वास्तववादी कादंबरीमध्ये घडते. आरंभी माणूस म्हणून सरळ साधा असलेला; पण नंतर वाङ्मयीन कर्तृत्वाने प्रतिष्ठा पावलेला साहित्यिक नकळत दांभिक, दुटप्पी कसा होतो, स्वत:च्या मोठेपणाला प्रत्यक्षाप्रत्यक्ष सतत कसा गोंजारतो, आपल्या मोठेपणाचा फायदा फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी कसा करून घेतो, अधिकाधिक मोठे होण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा कशी बाळगतो, साहित्यिक सृष्टीचे आकर्षम असणार्‍या स्त्रियांना चतुराईने आमिष दाखवून आयुष्यातून कसा उठवतो, मोठेपणाच्या जोरावर पाश्चात्य वाङ्मयातील चोर्‍या करून संभावितासारखा तो स्वत:चाच स्वतंत्र साहित्यकृती असल्याचा पवित्रा कसा घेतो साहित्यकलेचे कातडे पांघरून, कलावंताच्या स्वातंत्र्याचा फायदा घेत स्वत: स्वैराचारी कसा बनतो, अंतिमत: तो स्वत: अधोगतीला जाऊन त्याच्याच सर्व संचिताचा नाश कसा करतो,... आणि स्वत:च्याच मोठेपणाला आत्मकेंद्री वृत्तीने सतत गोंजारल्यामुळे त्याचा सर्वांगीण आत्मनाशही कसा होतो, यांचे नाट्यपूर्ण घटना - प्रसंगांतून मनाचा अखेर शोकात्म अंत कसा होतो, याचा वेध घेणारी ठरते.

म्हणून ती रसिक वाचकांना जीवनाच्या निकोप दृष्टिकोनाचे दिग्दर्शन करणारी तर वाटेलच, पण कलावंत लेखकांनाही धोक्याचा कंदील दाखवून त्यांचे उद्बोधन करू शकेल, अशा योग्यतेची आहे.

We Also Recommend