
Jhashichi Rani Laxmibai by Pratibha Ranade
ध्यानीमनी नसतानाही जी झाशीसारख्या मातब्बर संस्थानाची राणी झाली आणि नियतीच्या लहरी स्वभावामुळे जी अकाली विधवाही झाली, अशी एक कालपटावरची बाहुली.....वैधव्यानंतरचे केशवपनासारखे जाचक निर्बंध युक्तीप्रयुक्तीने दूर सारणारी एक स्वयंभू स्त्री....संस्थाने खालसा करण्यामागचा कंपनी सरकारचा कावा १८५४ सालीच ओळखून त्या सरकारचा दुटप्पीपणा वेशीवर टांगणारी पहिली भारतीय संस्थानिक....असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता.....झाशीची राणी लक्ष्मीबाई.