
Jag Badal Ghaluni Ghav By Ekanatha Aavad
गरीब घरात जन्माला येऊनही स्वकष्टाने जग निर्माण करण्याचा, समाजालाही सुधारणेच्या दिशेने घेऊन जाण्याचा ध्यास घेतलेल्या एकनाथ आवाड यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे हे पुस्तक आहे. प्रशांत खुंटे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. आवाडांनी समाजबदलासाठी वेगळा मार्ग अनुसरला. लाचारीचे जगणे धुडकावून त्यांनी शिक्षण घेतले. एमएसडब्ल्यू, वकील अशा पदव्या घेऊनही बड्या पगाराची नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. समाजाप्रती काही करण्याची त्यांची धडपड अखंड सुरूच राहिली. त्यांचे बालपण, कामानिमित्ताने घडलेला प्रवास या सर्व गोष्टींना शब्दबद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ही सर्व माहिती गोळा करण्यात आली. आवाडांसोबत काम करणार्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे अनुभव मांडण्यात आले आहे. या सगळ्यातून उलगडत गेलेले एकनाथ आवाड यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचे सुरेख चित्रण खूपच बोलके झाले आहे. त्यांचे अनुभव सर्वांना प्रेरक ठरतील अशा पद्धतीने मांडण्यात आले आहेत.
-- ई-सकाळ २० ऑगस्ट २०११
-- ई-सकाळ २० ऑगस्ट २०११