Ithe Khari Mumbai Bhetate by Pukar

Ithe Khari Mumbai Bhetate by Pukar

  • Rs. 149.00
  • Save Rs. 1


Join as Seller
ही एका जगावेगळ्या प्रयोगाची कहाणी आहे. शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच स्वतःच्या जगण्याचा अन परिसराचा अभ्यास करायचा आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असा हा प्रयोग.
अर्जुन अप्पादुराई हे शहरीकरणाच्या प्रक्रियेचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक. स्वतः विद्यापीठीय संशोधक असूनही संशोधन ही केवळ उच्चशिक्षित उच्चभ्रूंची मक्तेदारी असता कामा नये, असं त्यांचं म्हणणं होतं. हे म्हणणं प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी मुंबईला प्रयोगशाळा मानलं. मुंबईतल्या बांधकाम मजुरांपासून ते कचरावेचक तरुणांपर्यंत आणि अंधअपंगांपासून ते कधीही घराबाहेर न पडलेल्या मुस्लिम तरुणींपर्यंत अनेकांना त्यांनी आपल्याच जगण्याची शोधाशोध करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी केलेल्या नोंदींना संशोधनाइतकंच महत्त्व दिलं आणि संशोधनाचंच हे हत्यार वापरून स्वतःचा विकास साधण्याचं बळही दिलं. यातूनच उभी राहिली स्वतःच्या आणि शहराच्या समस्यांचा अभ्यास करणारी, त्यावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारी अनवाणी युवा संशोधकांची फळी.
अप्पादुराई यांनी सुरू केलेल्या `पुकार` या संस्थेमध्ये आजवर हजारो अनवाणी युवा संशोधकांनी अज्ञात आणि वंचित मुंबईच्या स्पंदनांची नोंद केली आहे आणि या शहराचं एक वेगळं रूप जगासमोर आणलं आहे.

We Also Recommend