He Manse Mothich By Shrikrushn Dalvi

He Manse Mothich By Shrikrushn Dalvi

  • Rs. 49.00
  • Save Rs. 51


Join as Seller
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील अनेक तपस्वींची ओघवत्या शैलीतील जीवनकहाणी श्रीकृष्ण दळवी यांच्या 'ही माणसे मोठीच' या पुस्तकात वाचायला मिळते. शास्त्रीय संगीताचे अभ्यासक म्हणून दळवी यांनी अनेक वर्षं संगीत- समीक्षा केली. यशवंतबुवा जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ गायका-कडे ते शास्त्रीय संगीत शिकले. शास्त्रीय संगीताच्या मैफलींबरोबरच ते संगीत नाटकात कामही करत. पण एका आजारपणानंतर ते अशक्य झालं, तरी संगीताचा अभ्यास त्यांनी सोडला नाही.
वासुदेवबुवा जोशी, देवजीबुवा, बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, विष्णू दिगंबर पलुस्कर, गायनाचार्य मिराशीबुवा, मल्लिकार्जुन मन्सूर, रामकृष्ण बुवा वझे, भास्कर बुवा बखले, पंडित गजाननराव जोशी, अल्लादियाखां, अब्दुल करीम-खां, जगन्नाथबुवा पुरोहित, पंडित विष्णू नारायण भातखंडे, गणेश हरी रानडे, कुमार गंधर्व अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ गानतपस्वींवर प्रसन्न शैलीत लिहून श्रीकृष्ण दळवी यांनी रसिकांच्या दृष्टीने फार मोठं कार्य केलं आहे. मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं ऐकण्यासाठी दळवींच्या मामाने त्यांना बालवयात नेलं होतं. पुढे मन्सूर, भीमसेन जोशी आणि रवीशंकर या 'त्रिमूर्ती'च्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी त्यांना लाभली! 'ही माणसे मोठीच' हे पुस्तक म्हणजे संगीत-रसिकांसाठी शब्द-मैफलीची आनंद-पर्वणी आहे.

We Also Recommend