He Hi Divas Jatil by Dr.Anand Nadkarni

He Hi Divas Jatil by Dr.Anand Nadkarni

  • Rs. 75.00
  • Save Rs. 25


Join as Seller
...ज्याच्या नजरेतून ही गोष्ट सांगितली आहे त्या मुलाचे नाव आहे मोहन. सतरा-अठरा वर्षाचा हा अनाथ मुलगा. कोकणातल्या एका गावातला. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणारा, एका आजारी मुलाचा, सुहासचा; ’केअरटेकर’ म्हणून मुंबईला येतो. लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये सुहासबरोबर राहाताना त्याला भेटतात वेगवेगळया आजारांशी सामना देणारी मुले, त्यांचे कुटुंबीय. शिवाय हॉस्पिटलच्या जगातल्या अनेक व्यक्ती. आजवर, फक्त येणा-या चोवीस तासाच्या हिशोबाने जगण्याला अंगावर घेणा-या मोहनला हया वातावरणात जाण होते स्वत:मधल्या करुणेची, सेवाभावाची! आजार आणि आरोग्य, जीवन आणि मरण अशा टोकांमध्ये हेलकावणारे हॉस्पिटलचे दिनक्रम मोहन संवेदनशीलतेने टिपू लागतो. जगण्यावर प्रेम करणारी इच्छाशक्ती, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना आणि नियतीच्या निरगाठी हया प्रवाहात मोहन कधी सहभागी होतो त्याचे त्यालाही कळत नाही. जशी मदत करणारी माणसे भेटतात तशी अडचणी उभ्या करणारी माणसेसुद्धा. हळूहळू वॉर्डातले छोटे, मोहनसाठी ’माझी मुले’ बनून जातात. मोहनच्या जगण्याला एक निश्चित दिशा मिळते. मोहन, सुहास आणि मोहनाच्या मुलांचआ प्रवास सुरूच राहतो, वास्तवाचे भान ठेवून आणि मनातल्या स्वप्नांची जाण ठेवून. ही कहाणी घरातल्या सर्वांनी (शक्य झाल्यास एकत्र, मोठयाने) वाचण्यासाठी आहे. डॉ. आनंद नाडकर्णी एम. डी., डी. पी. एम. (मनोविकारतज्ज्ञ) १. ठाण्यामध्ये आय. पी. एच. अर्थात ’इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ या संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. २. पुण्याच्या ’मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक, विश्वस्त आणि सल्लागार. ३. मानसिक आरोग्य आणि समाज यांच्यामधली अज्ञान आणि गैरसमजुतींची दरी कमी करण्यासाठी अनेक माध्यामातून अथक प्रयत्न. ४. स्वभावविभाव, विषादयोग, मुक्तीपत्रे, मनोगती, शहाण्यांचा सायकिअट्रिस्ट अशा एकूण १६ पुस्तकांचे लेखन. ५. सध्या मराठी व्यावसायिक रंगभूमीवरती सादर होत असलेल्या ’गेट वेल सून’ आणि ’जन्मरहस्य’ या नाटकांचे लेखन. मनोविकारशास्त्र, व्यसनमुक्ती आणि सामाजिक कार्य या संदर्भातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

We Also Recommend