Alt Text

Hati Jyanchya Shunya Hote By Arun Shevate

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


Join as Seller
ई-सकाळ रविवार ७ मे २००६
जगण्याची उमेद वाढविणारे...

आ पले भवितव्य आपल्याच हातात असते, असे नेहमी सांगितले जाते. जगातल्या यच्चयावत कर्तृत्ववान माणसांचे जीवनचरित्र नुसते नजरेखालून घातले, तरी ही बाब स्पष्ट होईल. पंधराव्या शतकात रंगभूमीवर अफाट प्रयोग करणारा नाटककार विल्यम शेक्सपिअर असो किंवा आपल्या विनोदाने सर्व जगाला वेडा करणारा चार्ली चॅप्लीन असो, कंदील आणि नांगर विकता विकता रयत शिक्षणसंस्था उभी करणारे द्रष्टे कर्मवीर असोत किंवा मॅट्रिकला नापास झाल्यावर उदबत्या विकून चरितार्थ चालविणारे अण्णा माडगूळकर असोत, अशी कर्तृत्ववान माणसेच आपल्या जगण्याला खरे बळ देत असतात. जगण्याची उमेद वाढवतात आणि आपले आयुष्य समृद्ध करतानाच आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवतात. अरुण शेवते यांनी संपादित केलेले "हाती ज्यांच्या शून्य होते,' हे पुस्तक अशाच कर्तृत्ववान माणसांची कहाणी सांगते. 

कर्तृत्ववान माणसांचे वैभव सर्वांनाच दिसत असते. या वैभवाने क्वचित काळ दिपूनही जायला होते; परंतु या वैभवाच्या मागेही कधी काळी एक अंधार होता, याचा सर्वांनाच विसर पडतो. या अंधाराला छेद देत ही माणसे हे वैभव खेचून आणतात. त्यांचा हा संघर्षच शेवते यांच्या पुस्तकाचा गाभा आहे. अब्राहम लिंकन, शेक्सपिअर, चार्ली चॅप्लीन, ग्रेटा गार्बो, स्टीव्ह जॉब्स या परदेशी व्यक्तींबरोबरच लक्ष्मणराव किर्लोस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ग.दि.मा., गुलजार, सुधीर फडके, निळू फुले, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख या देशी मातीतल्या माणसांचा संघर्षही वाचायला मिळतो. तो जसा रंजक आहे, तसाच प्रेरणादायीही. 

या व्यक्तींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांतील वेचे किंवा त्यांच्याविषयीचे लेख या पुस्तकात संकलित केले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक कर्तृत्ववान माणसांची किमान तोंडओळख का होईना पण होते. यातले विष्णुपंत छत्रे, ग्रेटा गार्बो असे काही लेख तर संदर्भांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे आहेत. मुख्य म्हणजे "आपणही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो,' असा आशावाद हे पुस्तक जागवते. 

- गोपाळ जोशी

We Also Recommend