
Harawalelya Wata by Madhavi Desai
माणसाचा स्वभावच विचित्र असतो. त्याला जे मिळालेलं असतं, ते त्याला कधीच आवडत नसतं. आणि जे अप्राप्य, त्याचा हव्यास लागलेला असतो. या वाटेवरून चालावं, तोवर पलीकडची वाट बरी वाटते; आणि या संभ्रमातच खरी वाट हरवून जाते. संसारात अनेक स्त्री-पुरुष अशा हरवलेल्या वाटांवरून चालत असतात. खरी वाट शोधत असतात. ज्यांना जीवनाचा स्पष्ट अर्थ समजलेला असतो, ते मात्र समतोल वृत्तीने वाटचाल करत असतात. अशा जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी- हरवलेल्या वाटा!