
Gosht Khas Pustakachi by Suhas Kulkarni
काही पुस्तकं वाचकांच्या मनात घर करून बसलेली असतात. लेखक तर पुस्तकांचे निर्मातेच. स्वत: निर्मिलेल्या पुस्तकांबद्दल त्यांना किती थोर भावना असेल! पण त्यांच्यातील या भावना वाचकांपर्यंत अपवादानेच पोहोचतात.लेखक आपल्या पुस्तकांबद्दल आपपरभाव करू शकत नाहीत. त्याला आपली सर्वच पुस्तकं सारखीच लाडकी असणार. पण तरीही एखादं पुस्तक त्याच्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने खास बनलेलं असतं. अशा ‘खास’ बनलेल्या पुस्तकाबद्दल लेखकाच्या मनात काय भावना असते? हे पुस्तक लिहिण्यामागे त्याची काय प्रेरणा होती? त्यासाठी त्याने काय तयारी किंवा अभ्यास केला होता? लिखाणाचा फॉर्म निवडताना काय विचार केला होता? वाचकांना पडणार्या अशा अनेक प्रश्नांबद्दल लिहिताहेत मराठीतील महत्त्वाचे पंधरा लेखक. मराठी पुस्तकविश्वातील एक आगळा प्रयोग.