Gonidanchi Durgachitre (‘गोनीदां’ची दुर्गचित्रे) by Veena Dev

Gonidanchi Durgachitre (‘गोनीदां’ची दुर्गचित्रे) by Veena Dev

  • Rs. 359.00
  • Save Rs. 41


Join as Seller
गोपाल नीलकण्ठ दाण्‍डेकर - मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. बहुपेडी व्यक्तिमत्त्व लाभलेले. जातिवंत भटक्या वृत्तीचे. त्यांनी महाराष्ट्रातले बहुतेक सर्व किल्ले पाहिले. त्यांतले काही तर पुन:पुन्हा पाहिले. दुर्गभ्रमणासंबंधी त्यांनी भावसंपन्न ललितलेखन केलं. हजारो वाचकांना ते वाचून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली. या भ्रमणकाळात त्यांनी असंख्य छायाचित्रं काढली; दुर्ग, ऎतिहासिक वास्तू आणि महाराष्ट्रातल्या निसर्गरूपांची. जवळपास पन्नास वर्षांपूर्वीपासूनची त्यांची ही चित्रयात्रा. त्या काळात त्यांनी गडकोटांच्या ज्या चित्रखुणा टिपल्या, त्यांतली निवडक छायाचित्रं म्हणजे ‘गोनीदां’ची दुर्गचित्रे. हा आहे इतिहासाच्या स्मरणखुणांचा दस्तऎवज. ही दुर्गचित्रं म्हणजे त्यांच्या कलादृष्टीचं प्रमाण. ते म्हणत, ‘आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केलं असेल, तर ते किल्यांवर.’ ‘गोनीदां’ची दुर्गचित्रे ही त्याची चित्रखूण आहे.

We Also Recommend