Ghei Chhand By Subodh Bhave

Ghei Chhand By Subodh Bhave

  • Rs. 349.00
  • Save Rs. 51


Join as Seller
ई-सकाळ १२ डिसेंबर २०१६
अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे या पुस्तकाच्या निमित्तानं लेखक बनला आहे. कट्यार काळजात घुसली नाटकाच्या दिग्दर्शनापासून याच शीर्षकाच्या चित्रपटापर्यंतचा प्रवास त्यानं शब्दबद्ध केला आहे. अभिनयाच्या क्षेत्राकडे तो कसा ओढला गेला, सुरवातीचा संघर्ष कसा होता, यावरही त्यानं लिहिलं आहे. त्यानंतर कट्यार हे नाटक दिग्दर्शनासाठी कसं आलं, त्यासाठी काय काय केलं हे त्यानं लिहिलं आहे. लोकमान्य आणि बालगंधर्व या चित्रपटांचं त्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्याबाबतचे अनुभवही त्यानं मांडले आहेत. या पुस्तकात सर्वांत भर आहे तो कट्यार चित्रपटावर. मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणार्‍या या चित्रपटाची सगळी जन्मकहाणी, त्याच्याशी संबंधित किस्से, सुबोधचे विचार अशा गोष्टींमुळे पुस्तक रंगतदार झालं आहे. अभय इनामदार यांनी शब्दांकन केलं आहे. या पुस्तकाबरोबर बालगंधर्व, लोकमान्य आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांच्या डीव्हीडीजही देण्यात आल्या आहेत.

We Also Recommend