
Gatha Irani By Meena Prabhu
मुळात इराणी प्रतिमा पर्यटनस्थळ अशी नाही. कडव्या मुस्लिम विचारसरणीचा पाश्चिमात्य विरोधी देश अशी ढोबळ प्रतिमा असलेल्या या देशात मीना प्रभूंनी 'दोन महिने भटकंती करून ही इराणी गाथा शब्दबद्ध केली आहे. काहीशी झटपट इराण यात्रा ठरल्यानं, शिवाय विविध देशांतील भटकंतीचा दांडगा अनुभव असल्याने असेल पण मीना प्रभू या वेळी फार आखणी न करता इराणमध्ये धडकल्या, मात्र अतिथ्यशील, प्रेमळ, उदार इराणी माणसांमुळे त्यांचं हे धाडस यशस्वी झालं. मीना प्रभूंना असलेली इतिहास, संस्कृती, भाषा यांची आवड, त्यांचा अभ्यास, जिज्ञासूवृत्ती आणि जास्तीत जास्त प्रदेश बघण्याची ओढ यामुळे ही इराणी गाथा अतिशय माहितीपूर्ण रंजक व वाचनीय झाली आहे.