Alt Text

Gangemadhye Gagan Vitalal By Ambarish Mishra

  • Rs. 79.00
  • Save Rs. 81


Join as Seller
गांधी - काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर.
गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत.
धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्या समोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं - सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं.
महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी ... या आणि अशाच काही जिवलग सहकार्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच गांधी रेखांकित होतो.
गांधीजींच्या नातेवाईक, मनुबेन यांच्या रोजनिशीतील फाळणीसंबंधीची लिहिलेली माहिती - मनुबेन लिहितात, "फाळणीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक ३१ मेपासून सुरू झाली. आदल्या दिवशीच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजींनी फाळणीला जोरदार विरोध केला. ते म्हणाले, "हिंदुस्थानची फाळणी करण्याचा हक्क इंग्रजांना नाही, हे आपण सगळ्यांनी संघटितपणे आणि स्वच्छपणे सांगून टाकले पाहिजे. बळाचा वापर करून पाकिस्तान होणार नाही. हिंदुस्थानची राख झाली तर ते मी एखाद वेळी सहन करीन, परंतु बळजबरीने पाकिस्तान मिळणार नाही.' पुढे १ जूनच्या रोजनिशीत त्या लिहितात - बापूजींना वाटतंय - "स्वातंत्र्याची पावलं उलटी पडताहेत असं मला वाटतं. स्वतंत्र भारताचं भविष्य चांगलं आहे, असं मला वाटत नाही. ते सगळं पाहण्यासाठी मला जिवंत ठेवू नकोस, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आहे. "गंगेमध्ये गगन वितळले' या पुस्तकातला हा भाग वाचण्यासारखा आहे.

We Also Recommend