
Gangajal by Iravati Karve
हा ललित - निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो. दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला, तरी कथा नसतो. ते एक चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते. वेगवेगळया पातळयांवरून वेगवेगळया दिशेने सतत चिंतन करणारे आणि जीवनाचा अर्थ लावणारे अखंड प्रवासी, भटके मन, युगानुयुगांच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करीत आहे. या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेले सौंदर्य हा हया प्रवाशाच्या संवेदनक्षम मनाचा एक विभ्रम आहे.