Ganga by Prakash Akolkar

Ganga by Prakash Akolkar

  • Rs. 249.00
  • Save Rs. 46


Join as Seller
भारतीयांच्या मनात गंगेचं नेमकं स्थान आहे तरी काय?
हिमालयातल्या डोंगरदऱ्या पार करून थेट कोलकात्याच्या सगर बेटापाशी समुद्राला जाऊन मिळणारी ही नदी. या नदीच्या नुसत्या दर्शनाने कोट्यवधी भारतीयांचे हात आपोआप जोडले जातात आणि गंगाजल म्हणजे तर साक्षात अमृत. गंगास्नान आणि गंगाजलप्राशन या दुहेरी योगानंतर स्वर्गाची दारे हमखास खुली होतात, अशी मनापासून श्रद्धा असलेले आपण भारतीय या नदीची इतकी वाट कशी काय लावू शकतो?
टोकाचं प्रदूषण आणि कमालीची बेफिकीरी यामुळे या नदीचं अस्तित्वच धोक्यात आलंय.
पत्रकार ज्युलियन क्रॅंडॉल हॉलिक यांनी गोमुखापासून ते सगर बेटापर्यंत केलेल्या प्रवासाच्या प्रवास वर्णनाच्या पलीकडे नेणारे, एका सजग पत्रकारानं गंगेच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातल्या रूपाविषयी केलेलं मनोज्ञ चिंतन.
मानववनिर्मित प्रदूषणामुळे असहाय्य गंगेची स्थिती विज्ञानाचे दाखले देत एका क्षणी कथन करते, तर पुढच्याच क्षणी भाविकांच्या मनातल्या गंगेचे अपार महत्त्व वर्णन करते.
भौतिक पातळीवर या नदीचा होत चाललेला ऱ्हास तिचं सारं सत्वंच् धोक्यात आणू शकतो.... हेच हॉलिक यांच्या प्रवासाचं सार!

We Also Recommend