Alt Text

For Your Eyes Only By Ian Fleming

  • Rs. 60.00
  • Save Rs. 60


Join as Seller
अनुवादक - अनिल काळे
"माय नेम ईस बॉंड ... जेम्स बॉंड."
ती टेबलापाशी पोहोचली. बॉंडची नजर तिच्यावरच खिळलेली होती. 'काही उपयोग नाही,' त्यानं निराशेनं स्वत:शीच म्हटलं. 'आपल्याकडे कसली येते ती? ती नक्कीच तिच्या कुणा दोस्ताला भेटायला येत असणार. असली सुंदर पोरगी नेहमी दुसर्‍याच कुणाच्या नशिबात असते. हं! काय पण नशीब आहे!'
पण त्यानं स्वत:ला सावरण्याअधीच ती त्याच्या जवळ आलेली होती. एवढंच काय,चक्क त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलीही होती. 'सॉरी मला उशीर झाला. आपल्याला लगेच निघावं लागेल. तुला ताबडतोब ऑफिसमध्ये बोलावलंय.' भराभरा ती बोलली आणि मग तिनं हळूच दोन शब्द उच्चारले, 'क्रॅश डTRईव्ह.'
अचानक आलेल्या अडचणी आणि दिसतात त्यापेक्षा कुणी वेगळ्याच असलेल्या सुंदर पोरी, या दोन्ही गोष्टी जेम्स बॉंडच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनून गेल्या आहेत आणि जेव्हा एखादी कामगिरी त्याच्यावर सोपवलेली असते, तेव्हा ही सगळी कहाणी उत्कंठावर्धक असणार हे नक्की असतं. - एखाद्या क्यूबन गुंडाच्या हत्येची अमेरिकेतली कहाणी असो. हेरॉईनचा व्यापार करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा नायनाट करण्याची कामगिरी असो किंवा सेशेल्समध्ये अचानक झालेला एखादा मृत्यू असो, बॉंड ती कामगिरी त्याच्या खास पद्धतीनंच पार पाडणार...

We Also Recommend