
Fifty Years Of Silence by Nila Chandorkar
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नव्हे, गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता. असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षांनंतरही यात्किंचितही कमी झालेली नाही.