Ek Sampadak.... Ek Lekhika |एक संपादक आणि एक लेखिका Author: Dr. Anjali Soman | डॉ. अंजली सोमण

Ek Sampadak.... Ek Lekhika |एक संपादक आणि एक लेखिका Author: Dr. Anjali Soman | डॉ. अंजली सोमण

  • Rs. 109.00
  • Save Rs. 11


Join as Seller

दोन माणसांमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचे त्याचे स्वत:चे असे महत्त्व असते. हा पत्रव्यवहार तुमच्याशी बोलत असतो. त्या दोन माणसांमधील नाते ध्वनित करतो. स्पष्ट करत असतो. शंकरराव किर्लोस्कर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार याच पद्धतीचा आहे. शंकरराव आणि आनंदीबाई या दोघांचीही आत्मचरित्रे बर्‍याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहेत. आता प्रसिद्ध होत असलेला या दोघांमधील पत्रव्यवहार त्यांच्या आत्मचरित्रांत जे आले आहे ते अधिक स्पष्टपणे, ठसठशीतपणे मांडतो. शंकरराव आणि आनंदीबाई यांच्यातील पत्रव्यवहाराचे आणखी एक महत्त्व आहे. ‘एक संपादक आणि एक लेखिका’ यांच्यात कसे संबंध असावेत याचे तो दिशादिग्दर्शन करतो. संपादक आणि लेखक यांच्यातील संबंध केवळ व्यावहारिक, आर्थिक बाबींबद्दल नसतात. त्या दोघांत ‘नितळ मैत्रभाव’ निर्माण होऊ शकतो असे हा पत्रव्यवहार दाखवून देतो.


We Also Recommend