
Egypt Well Ghonim ani Social Media ne Ghandavleli Kranti by Dhananjay Bijle
इजिप्तमधली हुकूमशाही राजवट उलथून टाकण्याच्या चळवळीची प्रेरणा असणाऱ्या वेल घोनिम या तरुणाची ही कहाणी आहे. गुगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या वेल घोनिमनं आपलं निवांत आयुष्य, भरभक्कम पगार यांची फिकीर न करता स्वत:चं आयुष्य देशवासीयांच्या हितासाठी पणाला लावलं. विशेष म्हणजे हे सारं करताना त्याच्या मनात कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत, राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती. हे सारं त्यानं केलं ते फेसबुकच्या माध्यमातून! सोशल मीडियाची ताकद किती जबरदस्त आहे, याची चुणूक इजिप्तमधल्या लक्षावधी तरुणांनी उभ्या जगाला दाखवून दिली. राष्ट्रप्रेमाचं, लोकशाहीचं आणि जनहिताचं स्फुलिंग त्यांच्या मनात जागवलं ते वेल घोनिम यानं! सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या देशाची राजवट नेस्तनाबूत होऊ शकते, हे इजिप्तमध्ये सिद्ध झालं. आधी जाहीर करून यशस्वी झालेली ही जगाच्या इतिहासातली पहिलीची क्रांती! या क्रांतीची आणि तिच्या प्रेरणेची कहाणी - इजिप्त... वेल घोनिम...!