Dwidal By P L Deshpande ( Pu la)

Dwidal By P L Deshpande ( Pu la)

  • Rs. 40.00
  • Save Rs. 30


मनाचे खेळ आणि साचेबद्ध जीवनाचा कंटाळा
"सारी रात्र" आणि "कदाचित" ह्या द्विदल नाटकांचे पुलंनी केलेले अनुवाद ह्या पुस्तकात एकत्र केले आहेत. "सारी रात्र" ह्या बादल सरकारांच्या नाटकात, वादळात सापडून वाट शोधताना एका पडक्या घरात आश्रय घेतलेल्या जोडप्याची कथा आहे. ह्या घरातल्या अविचलित शांततेतही त्यांना जिवंतपणाचा अनुभव येतो. ह्या जोडप्यातल्या स्त्रीला ज्या गोष्टीचा ध्यास असतो, तो खरं तर आभासच असतो हे घरातला वृद्ध जाणवून देतो. मोहन राकेश लिखित "कदाचित" ह्या नाटकात, जीवनाच्या त्याच त्याच क्रमाला कंटाळलेली दोन पात्रं म्हणजे स्त्री-पुरुष आहेत. निरसतेतही एकमेकांची काळजी घेण्याची त्यांची वृत्ती, त्यांच्यातल्या संवादातून कळते. पुलंनी आशयगर्भ शैलीत केलेला हा अनुवाद मनाला भावून जातो. 

We Also Recommend