
Durri the Second Lady by Raja Bhoyar
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक राजपुत्र असतो तशी प्रत्येक पूरुषाच्या मनात एक परी असते.ती त्याला दूर चांदण्यात दिसते.प्रत्यक्षात ज्याला ती भेटते तो भाग्यवंत. अशा जवळ येणार्या परीविषयी मनात धास्ती बाळगणारीही एक मानसिकता असते आणि ती बहुदा प्रामाणिक असते. 'दुर्री... द सेकंड लेडी' या राजा भोयर या अभियंत्याने लिहिलेल्या कादंबरीत अशा मानसिकतेचे चित्रण आहे. सारी मने सारखीच असल्याने हे चित्रण अनेकांना त्यांच्याही मनाचे वाटणारे आहे. दोन पिढ्यांच्या एका प्रदीर्घ कथानकात येणारे हे काहीसे धक्कादायक चित्र एकाच वेळी अंतर्मुख करणारे आणि प्रसंगी सुखावणारेही आहे.