Double Bell by Shraddha Belsare

Double Bell by Shraddha Belsare

  • Rs. 179.00
  • Save Rs. 20


Join as Seller
समाजातल्या प्रत्येक घटकाला रोजचं आयुष्य सुखासमाधानात जगता यावं आणि त्यातूनच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच कोणत्याही शासनव्यवस्थेचा कल्याणकारी हेतू असतो. परंतु काही मर्यादांमुळे प्रत्येक वेळी यश येईलच असं नसतं. पण यालाही अपवाद ठरतात. काही प्रशासकीय अधिकारी मात्र येणाऱ्या अडचणींवर निर्णय घेताना थोडंसं वेगळ्या वाटेनं जाऊन जनसामान्यांच्या भल्याचा विचार करत चाकोरी सोडण्याचं धैर्य दाखवतात. श्रद्धा बेलसरे-खारकर अशाच धडाडीच्या आणि कल्पक अधिकाऱ्यांपैकी एक!
नर्मदा आंदोलनातल्या विस्थापितांचा प्रश्र्न असो किंवा डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी असो, लोकराज्यसारख्या मासिकाचं संपादकपद असो, की महान्यूज ई-पोर्टलसारख्या महाजालाशी सामना असो; येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर स्वतःच्या कर्तृत्वानं, बुद्धिचातुर्यानं वेगळे, पण योग्य निर्णय घेत आपलं ध्येय साध्य करण्याच्या दिशेनं टाकलेली गतिशील, ठाम पावलं म्हणजे 'डबल बेल.'

We Also Recommend