Don Dhurvanvar Don Pavala By Suhas Mantri

Don Dhurvanvar Don Pavala By Suhas Mantri

  • Rs. 159.00
  • Save Rs. 131


Join as Seller
अंटार्क्टिका हा खरंतर संशोधकांचा विषय.अंटार्क्टिकाचं तापमान, तिथला वितळणारा बर्फ, तिथली जीवसृष्टी आदींबाबत संशोधकांना कायम कुतूहल वाटत आलं आहे. त्यासाठी विविध देशांतले संशोधक तिथं भेट देत असतात; पण अंटार्क्टिकावर "पर्यटना'साठी जाता येतं?
सुहास मंत्री हे एक वेगळे पर्यटक आहेत. त्यांच्या मनात एक जिप्सी दडलेला आहे, जो त्यांना जगाच्या पाठीवर ठायीठायी घेऊन जातो. थंडीवार्‍याला, संकाटाना तोंड देत पृथ्वीच्या दोन्ही टोकांना ते जाऊन आले. अथक जिद्द, निर्भयता आणि रसिकताही त्यांनी मनापासून जपली आहे.
तसं कुणी म्हटलं तरी लोक वेड्यात काढतील; पण अंटार्क्टिकावर पर्यटन करता येतं हे पुण्यातले सुहास मंत्री यांनी दाखवून दिलं आहे. केवळ अंटार्क्टिकाच नव्हे; तर आर्क्टिकवरही पर्यटन शक्य असल्याचं मंत्री त्यांनी सिद्ध केलं आहे. उद्योगाच्या निमित्तानं आणि पर्यटनाची आवड असल्यानं त्यांनी आजवर जगातल्या अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. कायम नावीन्याचा शोध घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळं त्यांनी अंटार्क्टिकावर जाण्याचा बेत आखला आणि पूर्णत्वालाही नेला. ४५ हजार किलोमीटरचा प्रवास असणारी अंटार्क्टिकाची ही पर्यटन मोहीम मंत्री यांनी पुस्तकरूपानं मांडली आहे. या पुस्तकाचं नाव आहे - "दोन ध्रुवांवर दोन पावलं.'
"नॅशनल जिऑग्राफिक' वाहिनीवरील कार्यक्रम पाहिल्यानंतर अंटार्क्टिकाला जाण्याची कल्पना मंत्री यांना सुचली. २००९ मध्ये त्यांनी या कल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. अर्जेटिंना ते अंटार्क्टिका हा सागरी प्रवास खरोखरच चित्तथरारक असाच आहे. (तिकडच्या) उन्हाळ्यातला प्रवास असला तरी त्याच वेळी असलेली जीवघेणी थंडी आणि सागरी प्रवासात ड्रेक पॅसेजसारखा खडतर आणि परीक्षा पाहणारा मार्ग यावर मात करीत अंटार्क्टिका गाठण्याचा आनंद मंत्री यांनी अनुभवला. तब्बल १० दिवस तिथं राहून अंटार्क्टिकावरील रंगीबेरंगी हिमनग, तिथली विविध बेटं, पेंग्विन, महाकाय पक्षी, व्हेल मासे, डिसेप्शन आयलंडचा गरम पाण्याचा किनारा, तिथले ज्वालामुखी आदींचं सुरेख वर्णन मंत्री यांनी केलं आहे. अंटार्क्टिकाच्या पर्यटनाची माहिती देत असताना मंत्री यांनी अंटार्क्टिकाच्या शोधाचा इतिहासही जागोजागी दिला आहे. अंटार्क्टिकावर आजपर्यंत ज्या ज्या मोहिमा झाल्या त्यांची आणि मानवाला अंटार्क्टिकाचं दर्शन केव्हा झालं, याची माहिती मंत्री यांनी दिली आहे. त्यामुळं पुस्तकाच्या वाचनीयता वाढली आहे. अंटार्क्टिकाची छायाचित्रं पुस्तकवाचनात अधिकच रंगत आणतात.
मंत्री यांनी वर्षभरानं आर्क्टिक खंडालाही भेट दिली. नॉर्वेमध्ये ट्रॉम्सो या गावात आकाशातले चमत्कार "नॉर्दर्न लाईट्स'च्या रूपानं दिसतात. हे नॉर्दर्न लाईट्स पाहण्यासाठी मंत्री यांनी ट्रॉम्सोवर "स्वारी' केली! तिथल्या स्लेजिंगचा-रेनडिअर गाडीचा-प्रवास, नॉर्दर्न लाईट्स पाहण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्यात आलेले यश, याचंही रसाळ वर्णन मंत्री यांनी पुस्तकाच्या दुसर्‍या भागात केलं आहे.
काहीतरी वेगळं करू पाहणार्‍यांना हे पुस्तक निश्चितच प्रोत्साहन देईल. नवं काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांना मंत्री यांनी या पुस्तकातून प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.

We Also Recommend