Dollar Bahu By Sudha Murthy

Dollar Bahu By Sudha Murthy

  • Rs. 99.00
  • Save Rs. 41


Join as Seller
अमेरिकाप्रेमी' भारतीयांच्या मानसिकतेचा अचूक वेध
'फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्‍या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात - पण माघारी जायला जमत नाही. तिथूनजावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही.
तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्‍याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समजत नाही.
पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.'
पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.'

उत्तर कर्नाटकातील उच्चशिक्षित मध्यम वर्गीय कुटुंबात १९५० साली जन्म.
बेंगळुर येथील इंडियन इन्स्टिट्यूत ऑफ सायन्स येथे कॉम्प्यूटर विषयातील एम. टेक. पदवी.
भारतातील अत्यंत यशस्वी नामांकित कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजी लि. चे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. एन. आर. नारायणमुर्ती यांच्याशी विवाहबद्ध होण्याआधी त्यांनी इंजिनियर म्हणून नोकरी केली. आज त्या इन्फोसिस फाउंडेशन्च्या अध्यक्ष आहेत.
भारतातील मध्यमवर्गातील पारंपारिक संघर्षाबरोबरच आधुनिक आर्थिक परिवर्तनामुळे निर्माण होणार्‍या समस्यांना त्यांच्या साहित्यात प्रमुख स्थान आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ललित कृतींनी भाषेची मर्यादा ओलांडून लोकप्रियता मिळवली आहे.
"डॉलर बहू" त्यातलीच एक कादंबरी.

We Also Recommend