
Divtya by Khaushal Davare
दिवट्या
दिवटा घर उजळणारा असतो, तसाच तो घर रसातळाला नेणारा असतो. या दिवट्यातील नायक आयुष्याला दिशा दाखवणारा आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात आत्मीयता निर्माण व्हावी इतकं सामर्थ्य या कथानकात आहे. खरं तर नन्नी व नायक या दोघातलं जगणं, द्वंद भरपूर कथानकाला वाव देणारं आहे. तेच सत्य नायकाच्या जगण्यातलं आहे.
दिवट्या हे खुशाल डवरे यांचे आत्मचरित्र. इतर दलित आत्मचरित्रांपेक्षा काहीसे वेगळे असणारे हे आत्मचरित्र वाचकांना आवडेल ते लेखकाच्या प्रामाणिक व सत्य निवेदनामुळे.
- बळवंत कांबळे