Dharmvadal By Nilu Damle

Dharmvadal By Nilu Damle

  • Rs. 99.00
  • Save Rs. 76


Join as Seller
धर्माचं समाज जीवनातील स्थान काय असावं, श्रद्धेला कितपत महत्त्व द्यावं, हे प्रश्न अलीकडच्या काही वर्षांत जगभर घनघोर चर्चेचा विषय बनले आहेत. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादाचा प्रश्न आणि त्याचे विविध पैलू निळू दामले यांनाही सतावू लागले. पुस्तकांची सुरुवात दामले यांनी ९/११ नंतर अमेरिकेत जे धर्मविषयक- विशेषत: इस्लामबाबत- विचारमंथन सुरू झालं, त्यापासून केली आहे. 'गुड मुस्लिम अॅंड बॅड मुस्लिम', 'एन्ड ऑफ फेथ : रिलीजन, टेरर अॅंड द फ्यूचर ऑफ रिझन', 'रीडिंग लोलिता इन इराण', 'इनफिडेल', 'एन्ड टू सफरिंग', इ. पुस्तकांचा आढावा दामले यांनी घेतला आहे. या सर्व पुस्तकांची चौकट व व्याप वेगवेगळा असला तरी हिंसा हे या सर्वातील समान सूत्र आहे. तेच धरून आणि त्याभोवती आपल्या व्यक्तिगत अनुभवांची गुंफण करून दामले यांनी शेवटी निष्कर्ष काढला आहे की, विविध बदलांमुळे आजचा समाज पूर्वीपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे या समाजाचं टिकणं, विकसित होणं, ही गोष्ट नव्याने ठरवावी लागणार आहे म्हणूनच समाजाला बांधणं हे धर्माचं प्रमुख काम असेल तर आता धर्माला बदलावं लागेल.

We Also Recommend