
Dharmik by Anil Awachat
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात फरक असतो का ? काही मानवी मूल्यांवर अनिल अवचट यांची श्रध्दा आहे. जी श्रध्दा माणसाला व्यापक बनवते, धर्म, जात, देश यांपलिकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवते, एवढेच काय निसर्गातल्या प्राणी, वनस्पती यांसारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला शिकवते, ती आवश्यक श्रध्दा आणि याउलट जी माणसाला संकुचित बनवते ती घातक श्रध्दा किंवा अंधश्रध्दा. भारतीय समाजातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्र्चन धर्मीयांमधील अंधश्रध्दांचा मागोवा घेणारे हे पुस्तक.