Dhage Aadave Ubhe by Anil Awachat

Dhage Aadave Ubhe by Anil Awachat

  • Rs. 112.00
  • Save Rs. 38


Join as Seller

ज्या ज्या वेळी स्वत:च्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वत:लाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग - कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही - फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर ? किंवा कामाठीपुर्‍यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर ? या समूहांमध्ये जन्मणार्‍या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात ! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता - बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.


We Also Recommend