
Devachya Navane by Manohar Sonawane
श्रद्धाळू माणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी नि सुखाच्या आशेने घरी परतावं, असा त्याचा नित्यनेम. त्याच्या या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा भला थोरला डोलारा उभा राहतो. देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी-कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावानं हे सारं कसं होतं याचा अभ्यासपूर्ण शोध.