Deshodeshiche Darshanik by Pracharya Shivajirao Bhosale

Deshodeshiche Darshanik by Pracharya Shivajirao Bhosale

  • Rs. 229.00
  • Save Rs. 21


Join as Seller
देशोदेशीचे दार्शनिक हे एक साहित्यस्वप्न आहे. जगात अनेक विचारवंत झाले, तत्वज्ञ झाले. त्यांनी जीवन पाहिले, अभ्यासले व त्यावर भाष्य केले. आपण ती जीवन भाष्ये अभ्यासली तर आपले व्यक्तिगत जीवन विचार सुंदर होईल. या विचारसौंदर्याच्या ध्यासातून अनेक दार्शनिकांच्या दारी थांबणे घडेल. एकाच अंगणात रुतून राहणे मला मानवणारे नव्हते. नवरात्रात भक्त मंदिरामागून मंदिरात जात राहतात, समोरच्या देवाची आरती करतात व त्या देवाला नमस्कार करून पुढच्या दरवाज्यातून आत शिरतात. पुढचा देव आणि त्या पुढची आरती अशी पदयात्रा चालत राहाते. ही प्रदक्षिणा भावपूर्ण आणि आनंददायक असते. देशोदेशीचे दार्शनिक ही अशीच एक भावपूर्ण विचारप्रदक्षिणा आहे.

We Also Recommend