Connect the Dots by Rashmi Bansal

Connect the Dots by Rashmi Bansal

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller
इनोव्हेशन म्हणजे कल्पकता ही जन्मजात असावी लागते. त्यातूनच उद्योजकतेचा कीडा जन्माला येतो. वेगळ्या वाटेवरून चालावं, ज्या क्षेत्रांत अद्यापि फारसं काम झालेलं नाही, अशा क्षेत्रात काम करावं असं धाडस करण्याचं बळ त्यातूनच मिळतं. नवा उद्योग उभा करणं, तो यशस्वी करणं यासाठी शिक्षण, मानाच्या पदव्या यांची गरज असतेच असं नाही. स्मार्टनेस, व्यवहारज्ञान आणि कोणत्याही कामाचा कमीपणा न बाळगता कष्टांची तयारी एवढ्या पुंजीवर इनोव्हेटिव्ह उद्योग उभारलेल्या, तसंच अनवट क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या अन् स्वत:चा आवाज ऐकणाऱ्या उद्योजकांच्या भन्नाट कथा! उद्योजकतेची प्रेरणा देणारं रश्मी बन्सल यांचं दुसरं बेस्टसेलर! एमबीएची पदवी नसतानाही ज्यांनी स्वत:चे व्यवसाय स्वबळावर उभे केले, अशा वीस उद्योजकांच्या कहाण्या! मोठी स्वप्नं पाहण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी उच्च पदवी किंवा पिढीजात श्रीमंती असायलाच हवी, असं काही नाही. ते सारं असतं, तुमच्या मनात, डोक्यात आणि हातात ही प्रेरणा देणारं पुस्तक!

We Also Recommend