Colours Of The Prison  by Arun Ferreria

Colours Of The Prison by Arun Ferreria

  • Rs. 144.00
  • Save Rs. 16


Join as Seller

मूळ लेखक : अरुण फरेरा
अनुवाद : रूपेश पाटकर

अरुण फरेरांनी स्वच्छ दृष्टीने आणि तटस्थपणे तुरुंगवासातला छळ, खोटे आरोप ठेवून वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत ठेवणं, कायद्याचं राज्य या नावाखाली संपूर्ण प्रक्रियेचं बेदरकारपणे उल्लंघन करणं याची हकीगत सांगितलेली आहे. आपल्या देशातल्या हजारो-लाखो लोकांचा, स्त्रियांचा, विशेषतः ज्यांच्याकडे वकील किंवा कायदेशीर साहाय्य मिळवण्यासाठीची साधनं नसतात; त्या सर्वांचा हा अनुभव आहे. या देशाला आणखी अशा पुस्तकांची गरज आहे.
- अरुंधती रॉय

मानवी हक्कांसाठी लढणार्‍या अरुण फरेरा या कार्यकर्त्यास नक्षलवादी असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलीस मे २००७ मध्ये अटक करतात. पुढच्या काही महिन्यांत गुन्हेगारी कटकारस्थान, खून, हत्यारे बाळगणे, दंगल माजविणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल केले जातात आणि महाराष्ट्रातील कुख्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याला खितपत ठेवलं जातं.
फरेरांच्या जवळपास पाच वर्षांच्या तुरुंगवासाची ही कहाणी आहे. हे वाचताना एका यातनाघराचा भयंकर तपशील आपल्या हाती लागतो. सतत होणारा छळ, मारहाण, अत्यंत भ्रष्ट व्यवस्था, कैद्यांचे परस्परांशी वागण्याचे संकेत, पाशवी अत्याचाराविरोधात कैद्यांनी पुकारलेले संप, तुरुंगाच्या संपूर्ण वातावरणात भरून असलेली असहायता आणि थोडीफार आशा पल्लवीत करणारा, कधीतरी मिळणारा दिलासा या वास्तवाशी वाचकाचा सामना होतो.
सप्टेंबर २०११ मध्ये फरेरांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता होते. मात्र स्वातंत्र्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फरेरांना सुटल्याबरोबर कारागृहाच्या गेटवरच साध्या वेशातील पोलीस पुन्हा अटक करतात. त्यांची वाट पाहत कारागृहाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या आपल्या कुटुंबीयांनाही ते पाहू शकत नाहीत आणि पुन्हा सुरू होतो त्यांचा व्यवस्थेशी संघर्ष. ज्या बनावट आरोपांमुळे त्यांना बंदिवास भोगावा लागतो, त्यातून त्यांच्या धाडसी मित्र आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने ते बाहेर पडतात.
‘कलर्स ऑफ द प्रिझन’ ही गजाआडच्या जीवनाची सत्यकथा आहे. मात्र ही कथा वाचकांना परिचित असलेल्या फिल्मी किंवा कल्पनारम्य कादंबर्‍यांसारखी नाही. तुरुंगातील यातनामय जीवनाचे केवळ हे वर्णन नाही तर न्यायासाठी दिलेली चिवट झुंज आणि माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा अंतिमतः होणारा विजय याची ही गोष्ट आहे.


We Also Recommend