
Chalegat by Pravin Bandekar
गेल्या पंचवीस एक वर्षांतील कोकणाचे वर्तमान,या वर्तमानाला आकार देणारे सामाजिक, राजकीय,आर्थिक ऊर्जास्त्रोत, त्यातून होणाऱ्या बदलांमुळे माणसांची होणारी ससेहोलपट,निर्माण झालेले विक्राळ प्रश्न या कादंबरीमधून बांदेकरांनी वाचकांसमोर ठेवले आहेत.मराठी कथनात्म साहित्यात समुद्र फारसा येत नाही.‘चाळेगत’मध्ये मात्र तो केंद्रस्थानी आहे आणि अत्यंत अभिनव पद्ध्तीने तो साकार झाला आहे.