Chala Yashaswi Hou by C E Potnis

Chala Yashaswi Hou by C E Potnis

  • Rs. 149.00
  • Save Rs. 11


Join as Seller
चला...यशस्वी होऊ या!' हे पुस्तक आयुष्यात यश मिळण्यासाठीचं मार्गदर्शक आहे. पण झटपट यश मिळवण्याची वरवरची सूत्रं हे पुस्तक सांगत नाही. जीवनाच्या मूलभूत व चिरंतन तत्त्वांवर ते आधारलेलं आहे. यशस्वी जीवनाचा पाया घडवणारी व तो भक्कम करणारी 26 तत्त्वं प्रभावी, पण सोप्या भाषेत या पुस्तकातून उलगडली आहेत. आपल्या आयुष्याची दिशा - ध्येय फक्त आपणच ठरवू शकतो, हा विश्र्वास हे पुस्तक देतं. विपरीत परिस्थितीत, संकटात आत्मविश्र्वास अविचल कसा ठेवायचा, ध्येय समोर ठेवून आयुष्याची दिशा निश्चित कशी करायची आणि हे सर्व स्वत:च्या इच्छाशक्तीच्या बळावर कसं करायचं याच्या परफेक्ट गाइडलाइन्स हे पुस्तक देतं. न्यूनगंड, अंधानुकरण, सर्जनशीलतेचा अभाव आणि पराभूत मनोवृत्ती यांच्यापासून आजचा तरुणवर्ग मुक्त व्हायला हवा आणि त्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे. समाजातल्या सर्व वयोगटांसाठी हे पुस्तक 'यश मिळवण्याचं गाइड' आहे.

We Also Recommend