झेंडूची फुले by प्र. के. अत्रे

झेंडूची फुले by प्र. के. अत्रे

  • Rs. 182.00
  • Save Rs. 61


Join as Seller
आचार्य अत्रे यांची सुप्रसिद्ध विडंबन काव्ये.
"... काव्यात क्रांती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रात परस्पर-प्रसंशा-संघ स्थापन झाले. तेव्हा त्यांचे ते नियम, ती ध्येये, त्या मंडळाच्या साप्ताहिक बैठका, तो नाविन्याचा व वैशीष्टाचा पोकळ अभिनिवेश, ते एका विषयावर अनेकांनी काव्य करणे, ते क्षुल्लक गोष्टींसाठीसुद्धा एकमेकांनी एकमेकांवर सकाळसंध्याकाळ स्तुतीचा वर्षाव करणे, तसेच कोणी आपण समोर असतांना केशवसुतांना कवि म्हणणेच रास्त नव्हे, असे म्हणावे, तर कोणी गोविंदाग्रज केवळ बुद्धीवर जगले - त्यांना हृदय नव्हते असा निर्वाळा द्यावा; कोणी नव्या प्रकारच्या खाणी खोदाव्या तर कोणी छंदाच्या आणि शब्दांच्या टांकसाळी घालाव्या; एक ना दोन अशी निरनिराळी सोंगे घेऊन ही कविमंडळी वाङ्मयात घुमाकूळ घालू लागली. म्हणूनच मला विडंबनाचे हत्यार उचलावे लागले."
-- आचार्य अत्रे यांची "उपहासिनी"साठी प्रस्तावना यातून.

"बोलूनचालून 'झेंडूची फुले'! यांना वास तरी कसला आणि
रंग तरी कसला? मोहक फुलांच्या सुवासासाठी हपापलेली
रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री
आहेराचा कसा स्वीकार करणार? उलट तिच्या भा-
वनेची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचे
पाप मात्र पदरी यायचे! तरीपण वाङ्मयाच्या
वरातीत कोतवाली घोड्याप्रमाणे पुढे पुढे
नाचणार्‍या घोडकवींच्या गळ्यांत सणां-
सुदीचे दिवशी माळा करून घाला-
यला जरी ही 'झेंडूची फुले'
उपयोगी पडली तरी लेख-
काला आपल्या श्रमाचे
सार्थक झल्यासारखे
वाटेल!
-- समर्पणातून

We Also Recommend