कुलकर्ण्यांची ममता व दीक्षितांची माधुरी by अनिरुद्ध बनहट्टी

कुलकर्ण्यांची ममता व दीक्षितांची माधुरी by अनिरुद्ध बनहट्टी

  • Rs. 114.00
  • Save Rs. 56


Join as Seller
"ममता व माधुरी' आणि "कौन बनेगा पिंकीपती?' या दोन कथासंग्रहांतून एकूण छत्तीस कथा अनिरुद्ध बनहट्टी यांनी लिहिल्या आहेत. बहुतेक कथांचे अनुभवविश्व बरेचसे सारखे. त्यातही वैद्यकीय महाविद्यालय आणि तेथील वसतिगृह, तेथील तरुण विद्यार्थी- विद्यार्थिनींचे विश्व, महाविद्यालयीन जीवन आणि तेथील विद्यार्थी जग हे एकत्र गृहित धरल्यावर या कथा "प्रेम' या भावनेशी निगडित असतील, हे तर उघड आहे. मात्र या बहुतेक प्रेमकथा हास्यकारक आणि विनोदी स्वरूपाच्या आहेत. तशा त्या असणे हे स्वाभाविकही आहे. गंभीर कथाविषयाप्रमाणे विनोदी कथाही-"प्रेम' या भावनेभोवतीच गुंफलेल्या असल्या तरी वेगवेगळ्या आशयाने आणि शैलीने नटविता येतात. अशा कथांतील विनोदही विविध स्वरूपांनी वाचकांच्या समोर येऊ शकतो. श्री. बनहट्टी यांच्या कथांतील अनुभवविश्व हे सामान्यत- सारखेच आहे आणि ते विनोदी असले तरी ते प्रहसनात्मक पातळीवरचे आहे. प्रहसन किंवा फार्स या प्रकारच्या विनोदी लेखनात वास्तवतेचा फारसा विचार केलेला नसतो. प्रहसनातील पात्रे आणि प्रसंग बर्‍याच वेळा शक्य कोटीतील नसतात. आणि ही पात्रे फार विचारपूर्वक वागतात किंवा बोलतात असेही नाही. श्री. बनहट्टी यांच्या बहुतेक प्रेमकथा याच पठडीतील आहेत. महाविद्यालयातील हे तरुण किंवा तरुणी दिसताक्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यातील नायिका ही अप्रतिम सौंदर्यवती असते. मग अपेक्षेनुसार त्यात काही अडचणी आणि संकटे येतात. गैरसमज, दु-ख, विरह या अवस्था निर्माण होतात. पण बर्‍याच वेळा त्यांचा शेवट गोड होतो. श्री. बनहट्टी यांच्या बर्‍याच प्रेमकथा या वळणाने जातात.

We Also Recommend