क्लोरोफॉर्म by डॉ. अरुण लिमये

क्लोरोफॉर्म by डॉ. अरुण लिमये

  • Rs. 150.00
  • Save Rs. 50


Join as Seller
'क्लोरोफॉर्म'ची पहिली आवृत्ती ऑगस्ट १९७८ मध्ये प्रसिद्ध झाली. कॅन्सरमुळे, मृत्यूच्या छायेत असताना लिहिलेल्या या आत्मकथनामधून वैद्यकीय व्यवसायातील काही अपप्रवृत्तींवर प्रकाशझोत असल्यासारखे झाले. 

काहींना त्यातून वैद्यकीय क्षेत्रातले वास्तव जाणवले तर काहींना डॉ. अरुण लिमयांचे हे लेखन म्हणजे व्यावसायिक नीतीचा भंग करून केलेली आवाजवी टीका आहे असें वाटले. पुस्तकाच्या निमित्ताने परिसंवाद झाले, चर्चा झाडल्या आणि परस्परविरोधी मतप्रदर्शन करणारे लेखही प्रसिद्ध झाले. 

आज वैद्यकीय व्यवसायाची आणि एकूणच आरोग्यव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती १९७८ पेक्षा सुधारली आहे की कुधारली आहे याबद्दल आपण या पुस्तकाच्या संदर्भात आणि आपल्याला येणाऱ्या अनुभवांवरून विचारू शकतो.

कसेही असले तरी डॉ. लीमायांचा मेडिकल कॉलेजमधील रंगीबेरंगी दिवसांपासून सुरु झालेला आणि डॉक्टरी व्यवसाय सोडून देऊन समाजकारणात संपूर्णपणे झोकून देण्यापर्यंतचा हा प्रवास जुन्यांप्रमाणेच नव्या वाचकांनाही विचारप्रवृत्त आणि कृतीप्रणव करेल
उषा मेहता

We Also Recommend