मनाचिये डोही by मृणालिनी चितळे

मनाचिये डोही by मृणालिनी चितळे

  • Rs. 225.00
  • Save Rs. 75


Join as Seller
लोकसत्ता २ सप्तEंबर २००३
विज्ञान ङ भावना 
'मनाचिये डोही' हा मृणालिनी चितळे यांचा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या सर्व कथा वैद्यकीय विश्वाशी निगडित अशा आहेत. 
मनुष्य स्वभावाचे आणि मानवी जीवनातील भावभावनांचे एका वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले चित्रण या कथांमध्ये आढळून येते. काही कथांमध्ये हे अनुभव रुग्णाचे स्वत:चे आहेत, 
तर काही कथा वैद्यकीय व्यावसायिकाच्या भूमिकेतून लिहिलेल्या आहेत. या कथांमध्ये शारीरिक व्याधींमुळे मनाला येणारी दुर्बलता आढळते, तर कधी व्याधींमुळेच मनाला मिळणारे बळही आढळते. 
तसे पाहिले, तर वैद्यकीय अनुभव या एकाच भूमिकेतून लिहिल्या गेलेल्या कथा एकसुरी होण्याची खूप शक्यता होती, परंतु लेखिकेने प्रत्येक वैद्यकीय घटना तिच्या सर्व पैलूंनी समजून घेतलेली दिसते आणि मग त्यातील एखाद्या गोष्टीवर भर देऊन त्या घटनेत गुंतलेल्या माणसांच्या भावभावना, त्यांचे आपापसातील नातेसंबंध या सर्व गोष्टींचा शोध घेत कथा पूर्ण केली आहे, असे जाणवते. त्यामुळे या कथा एकसुरी झालेल्या नाहीत. 
रोजच अनेक तर्‍हांचे अनेक रोगांनी ग्रस्त असे रुग्ण डॉक्टरला भेटत असतात. त्याच्या खासगी जीवनामध्ये गुंतून पडायचे नाही, असे ठरवूनही कधी कधी माणुसकीच्या नात्याने डॉक्टर त्या रुग्णाशी बांधला जातो आणि मग त्या रुग्णासाठी घ्यावे लागणारे निर्णय किती अस्वस्थ करुन टाकणारे असतात, याचा प्रत्यय या संग्रहातील कथा वाचताना येतो. 
'ईश्वरसाक्ष खरं सांगेन' या कथेतील डॉ. जान्हवीला शपथेवर खोटे बोलण्यासाठी द्यावा लागलेला निर्णय विचारमंथनानंतर तिलाही योग्य वाटतो. त्या काळातील तिच्या मनाची उलघाल ही खरे तर वैद्यकीय बाब नाही. परंतु माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीची परीक्षा किती प्रकारांनी होऊ शकते, हे या कथेमध्ये चांगलेच जाणवते. 
'आम्ही दोघी बहिणी जोडीच्या' ही विलक्षण कथा जगावेगळ्या दोन्ही बहिणींचे मनोव्यापार अतिशय हळवेपमाने आणि तरीही डोळे उघडे ठेवून उलगडून दाखवते. 
'अट्टाहास' या कथेत आजच्या काळातील वजन कमी करण्याच्या नादिष्टपणावर भाष्य करताना त्यातील धोकेही दाखवले गेले आहेत. 'आणि ते रांगू लागले...' यासारखी उपरोधिक विनोदी कथा या कथासंग्रहाला अधिक खुलवते. तर 'नियती'सारखी एकाच दिवशी जन्मलेल्या, एकच आजार वाट्याला आलेल्या दोन मुलींची संपूर्ण विरुद्ध दिशांनी जाणारी आयुष्ये वाचकाला विचार करायला भाग पाडतात. 
'मनाचिये डोही' या कथासंग्रहातील कथा रुग्णांच्या मनोव्यापारांची उकल तर करुन दाखवतातच परंतु त्याचबरोबर वैद्यकीय व्यावसायिकांच्या भावनांनाही न्याय देतात. हे या कथांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 
मृणालिनी चितळे या फारच थोडे लेखन करतात. परंतु त्याचे लेखन ताकदीचे आहे. त्यांची कथा कसदार आहे. कथेचा प्राण समजून घेऊन ती फुलवत नेण्याचे कौशल्य त्यांच्या लेखनामध्ये आजच जाणवून येऊ लागले आहे. त्यांची शैली सरळ-साधी अशी आहे, त्यामुळेच ती आकर्षकही आहे. 
वेगळ्या विषयावरील आणि वेगळ्या विचारांच्या कथांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आहे आणि कथालेखिका म्हणून मृणालिनी चितळे यांच्याविषयीच्या अपेक्षा उंचावणारा आहे.
वेगळ्या विषयावरील आणि वेगळ्या विचारांच्या कथांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आहे आणि कथालेखिका म्हणून मृणालिनी चितळे यांच्याविषयीच्या अपेक्षा उंचावणारा आहे.

We Also Recommend