आतला कप्पा by कविता शिरोडकर

आतला कप्पा by कविता शिरोडकर

  • Rs. 105.00
  • Save Rs. 35


Join as Seller
या कथासंग्रहात लेखिकेने अनेक कथांमधून व त्यातील प्रसंगांमधून प्रामुख्याने स्त्री-व्यक्तिरेखांच्या तसेच इतर पात्रांच्या मनोविश्वाचा अंतशरेध घेण्याचा केलेला प्रयत्न या कथांना एक वेगळे परिमाण देऊन जातो. या कथासंग्रहात एकंदर नऊ कथा आहेत. त्यातील एक-दोन कथा वगळता बाकीच्या नेहमीच्या कुटुंबकथांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या स्त्रीकेंद्रित असल्या तरी कथेतील पात्रं आणि त्यांचं जगणं या सार्‍या अनुभवाकडे त्रयस्थ वृत्तीने पाहतानाच त्यांचं मनोविश्व उलगडण्याचा प्रयत्न लेखिका करते. त्यामुळे प्रत्येक कथेमध्ये त्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगातील अनेक गूढ आणि चमत्कारिक भासणार्‍या भावना धक्का देऊन जातात.
-- भास्कर सहस्रबुद्धे, लोकसत्ता २९ मे २०१६

We Also Recommend