Toch Mee By Prabhakar Panshikar

Toch Mee By Prabhakar Panshikar

  • Rs. 149.00
  • Save Rs. 101


Join as Seller
प्रभाकर पणशीकरांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या सुमधुर आठवणी.
नाट्य, रंगभूमीवरचा कसलेला नट, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार अन एक छान गोष्टीवेल्हाळ माणूस. एखाद्या पट्टीच्या गायकानं सा.स.स.स लावावा आणि स्वरांना कुरवाळत, आपलंसं करत, त्यात्या स्वराला योग्य त्या कोंदणात बसवत एक अमूर्त स्वरशिल्प निर्माण करावं, तसं या पुस्तकात प्रत्येक नाटकाची जन्मकथा, त्याची निर्मिती, अडचणी, झालेले वाद, चर्चा, भांडणं, समजुती, सुखद प्रसंग या सार्यांतून ते नाटक कसं उभं राहिलं ते रसाळपणे आलं आहे. पण तरीही हे आत्मचरित्र आहे, कारण नाट्यसंसार आणि प्रत्यक्ष संसार दोन वेगवेगळे काढू न शकणार्‍या या अजरामर लखोबाची ही चरित्रकहाणी आहे. त्यांच्याच शब्दनाट्यांत! पट्टीचा कीर्तनकार श्रोत्यांना जसं मंत्रमुग्ध करतो, तशी ही पंतांची शैली.

We Also Recommend