
Boredum Moh Ahankar Yapasun Mukti (बोअरडम मोह अहंकार यांपासून मुक्ती) by Sirshree
ईश्वरात आणि मानवात काय फरक आहे? माणसाकडे कोर्या कागदावर सही मागितली, तर तो सहजासहजी करेल का? पण ईश्वराकडे अशी मागणी करताच तो म्हणेल, ‘‘अरे मानवा मी तर केवळ कोर्या कागदावरच सही करत असतो. मी मौनात राहतो आणि शून्य हेच माझं निवास स्थान… मी अशाच लोकांना सही देतो, जे विकारमुक्त आहेत, समर्पित आहेत…’’परंतु दुर्भाग्यवश विकारांमुळे माणूस ईश्वरीय गुण आणि त्याचं मार्गदर्शन स्वीकारू शकत नाही. आपलं शरीर म्हणजे भगवंताचं मंदीर. या शरीररूपी मंदिराला जडलेले मोह, अहंकार, लालसा, भय, द्वेष, आळस, नैराश्य, तुलना, क्रोध, स्वार्थ यांसारखे विकार काढून टाकण्यासाठी हे पुस्तक आपल्याला निश्चितच साहाय्यक ठरेल.