
Bhulabhulaiyya by V. P. Kale
‘भुलभुलैय्या’ हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचा-फॅण्टसीजचा-संग्रह. निवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या सार्या व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो.