
Barkulya Batkulya Shtorya by Prasad Kumthekar
’बारकुल्या बारकुल्या ष्टो-या’ ही प्रसाद कुमठेकर यांची नव्या रचना बंधाची मांडामांड करणारी कादंबरी. प्रयोगशीलतेच्या आहारी जाऊन आशयालाच बगल देणा-या कादंब-यांच्या जमान्यात, आशयाला बहुस्तरित्व प्राप्त करून देणा-या तपशीलाला अनोख्या पध्दतीने पसरवून नव्या रूपबंधाच्या सूचनशक्यता शोधणारी ही कादंबरी आहे.