Bai Byako Calendar By V P Kale (Vpau)

Bai Byako Calendar By V P Kale (Vpau)

  • Rs. 50.00
  • Save Rs. 50


सामान्य माणसाला आपल्या आयुष्यात हव्या असलेल्या 'भन्नाट थ्रिलिंग'च्या खास वपु शैलीतील मिस्किल कथा.

"... अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉंबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिर्‍हाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिर्‍हाडं रमाकांत लघाटेच्या बिर्‍हाडाकडे निघाली. अनेक वर्षात असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहा-पंधरा वर्षात घडण्याची शक्यता नव्हती ...'' 
वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे ! वपुंचे हे अनोखे वौशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. "आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे", याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा "प्लॉट" अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट ! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या "दिलखुलास", मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो ...

We Also Recommend