Atre Uvacha by Aacharya Atre

Atre Uvacha by Aacharya Atre

  • Rs. 168.00
  • Save Rs. 82


Join as Seller

"आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणाने वाभाडे काढले आहेत. गेली पन्नास वर्ष समाजाच्या सर्व अंतरंगामधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजा पर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकात आहे, ह्याची जाणीव माझ्याइतकी दुस-या कोणालाहि असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दंभाचा आणि ढोंगाचा जी बुजबुजाट झालेला आहे. त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोडया लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जीवनाशी मी कॄतज्ञ आहे. कारण माझे त्याने कोणतेहि लाड पुरवण्याचे बाकी ठेवले नाही. दारिद्रय पाहिले आहे. श्रीमंती अनुभवली आहे. अनवाणी चाललो आहे. मोटारीतून हिंडतो आहे. महाराष्ट्रातले सर्व मानसन्मान मिळवले आहेत. भारतीय कीर्तीची मानचिन्हेही लाभली आहेत. अर्धे जग मी हिंडून आलो आहे. अनेक महापुरुषांना जवळून पहाण्याचे भाग्यहि मला आयुष्यांत लाभले आहे. महाराष्ट्राचा मला प्रखर अभिमान आहे. भारतात जन्माला येणे हे दुर्लभतर आहे. ’दुर्लभं भारते जन्म, महाराष्ट्रे त्वतिदुर्लभम’. शौर्य आणि साधुत्व ह्यांचा दुर्मिळ संगम ह्या भूमीत झालेला आहे".


We Also Recommend