Alt Text

Ashi Vel By Saniya

  • Rs. 99.00
  • Save Rs. 81


Join as Seller
मिळून सार्‍याजणी ंर्च २०११
हा सानिया यांचा तेरावा कथासंग्रह. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत स्त्री मनाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून स्त्रीच्या अनुभवातील अदृश्य घटना कौशल्याने टिपण्याच्या त्यांच्या प्रतिभावंत लेखनाचा प्रत्यय त्यांच्या कथा, कादंबर्‍यांतून आलेलाच आहे. प्रस्तुत पुस्तकही त्याला अपवाद नाही. २००२ सालापासून विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या पंधरा कथांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. अतिशय साध्या साध्या वाटणार्‍या प्रसंगांतून, जे पुरुषाला कदाचित जाणवतही नाही, त्यातून स्त्री आयुष्याच्या संदर्भाचे धागे जुळवत शब्दांच्या पलीकडचे अर्थ लावत जाते, त्यातून तिच्या स्त्री म्हणून जगण्याचा अर्थ तिला अनेकदा प्रश्नांकित करतो, क्वचित उलगडतोही! याला स्त्रीवादी कथा वगैरे कुठल्याही लेबल खाली न बसवता अत्यंत समर्थपणे स्त्रीला समजून घेण्याची एक प्रक्रिया यातल्या अनेक कथांमध्ये उलगडत जाते. पुस्तकाला शीर्षक लाभलेली `अशी वेळ' ही कथा वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर एकटं राहणार्‍या स्त्रीच्या मन:स्थितीचा सखोल विचार करते. विस्मृतीची भीती आणि आयुष्यभराची स्मरणातली गाठोडी सोडता सोडता तिला जे वाटतं, की `बायका दिसतात वरून वरून साध्या आणि सामान्य आयुष्य घालवणार्‍या; पण जेव्हा केव्हा स्वत:लाच भिडतात, आणि जरा धीटपणे विचार करायला लागतात, तेव्हा कशा चलाख निघतात. पण तिथपर्यंत पोचणं तरी सोपं आहे का? - नाहीच? हे वाटणं हाच या कथासंग्रहातील सर्व कथांचा आत्मा आहे. `लेखकाची अर्धी गोष्ट' मधील `तुला बाई कळलीच नाही' असे स्पष्ट सांगून त्याचे भावविश्र्व ढवळून काढणारी कोणी अनामिक मैत्रीण, `असण्याचा प्रश्न' मधली मुलीला आणि मित्राला जोखताना स्वत:च्या आयुष्याला सारखे प्रश्न विचारणारी ती, कंगवे विकणारा म्हातारा आणि कंगव्याशी खेळणारी आपली मुलगी यातली संगती शोधणारी ती, `फक्त गृहिणी' आहे म्हणून खंत करणारी आणि नंतर मी `मी' आहे, साधी माणूस आहे. बाई आहे आणि विचार करत करत जगते. हे समजून आलेली ती! इथल्या प्रत्येक कथेतच आत्मपरीक्षण करणारी, डोळे उघडून जगणारी, विचार करणारी स्त्री भेटते. आजच्या काळात जगणारी ही स्त्री आपल्याला आपणच स्वत:ला भेटल्याचा आनंद देते हे तिचे खरे सामर्थ्य आहे.

We Also Recommend